अपरांत...

अपरांत... कोकणामध्ये पर्यावरण पूरक उद्योग निर्मितीसाठी प्रयत्नशील असणारा ग्रुप. अपरांतच्या कामाची संकल्पना सह्याद्री निसर्ग मित्र या निसर्ग संरक्षण संवर्धन क्षेत्रात गेली ३० वर्षे कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या कामामाधूनच झाली.

समृद्ध निसर्ग वैभवाने नटलेल्या व उत्तुंग ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोकण भूमीला अपरांत म्हणूनही ओळखले जाते. पूर्वेकडील सह्याद्री पर्वत व पश्चिमेकडील अमर्याद सागर यांच्या मध्ये असणाऱ्या या नितांत सुंदर प्रदेशामध्ये राहणारे लोकही तसेच निर्मळ, निसर्गप्रेमी, समाधानी आहेत. परंतू वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण व त्याचबरोबर बदलती जीवनशैली यामुळे कृषिप्रधान राहणीमानात खूप बदल होत गेला. आरोग्यसेवा, शिक्षण, दळणवळण यासारख्या जवळजवळ निःशुल्क होत असलेल्या बाबींवरील खर्चामध्ये कल्पनातीत वाढ झाली. पूर्वी गावातील कृषी उत्पन्न, लाकूड, पाणी उपलब्ध नैसर्गिक साधनांच्या सहाय्याने लोकांच्या खूपशा गरजा गावामध्येच भागत होत्या. सहाजिकच आर्थिक गरजा भागविण्यासाठी इतर काही साधने नसल्यामुळे नैसर्गिक स्र्तोतांचा वापर मोठ्याप्रमाणात करणे अनिवार्य ठरले.

Pic 01

कोकणाचे वैभव
आणि पर्यटन

सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या व पुढे डोंगर दऱ्यांमधील सदाहरित वनराजीं ते खारफुटीच्या जंगलांमधून वाट काढत विस्तीर्ण खाडीरुपात समुद्राला मिळणाऱ्या नद्यांच्या निसर्गरम्य परिसरात कोकण वसलेले आहे. जगभरातील पर्यटकांसाठी आदर्श ठरावेत अशा स्वच्छ, सुंदर, प्रशस्त व सुरक्षित समुद्र किनाऱ्यांची देणगी कोकणाला लाभली आहे. निसर्ग निरीक्षणासाठी वैशिष्ठ्यपूर्ण पक्षी, प्राणी तसेच नटलेला प्राचीन ऐतिहासिक स्थळांपासून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गडकिल्ले, जलदुर्गांचा गौरवशाली वारसा...

Pic 02

व्यवसाय निर्मिती
आणि मार्गदर्शन

कोकणात छोटे छोटे पर्यावरणपूरक उद्योग सुरु व्हावेत व रोजगाराची निर्मिती व्हावी, या करिता स्थानिकांना प्रोत्साहित करण्यासाठी गावागावांतून जनजागृती करण्याचे काम संस्थेतर्फे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये गावांतील इच्छुक लोकांना विनामूल्य व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते तसेच सदरच्या व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी साधन सामुग्रीही पुरविली जाते. संस्थेच्या “अपरांत” केंद्रातर्फे चिपळूण व खेड तालुक्यातील काही गावामधील महिला बचत गटांना त्यांच्याकडील सहज उपलब्ध साहित्यांच्या सहाय्याने गाईच्या शेणापासून सुगंधी धुपकांडी..